Mayakkadevi Palkhi Sohala 
सांगली

Sangli News : ‘मायाक्का देवीच्या नावानं चांगभलं!’

वळसंगमध्ये भक्तीचा जल्लोष ; हजारो भाविकांची उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

वळसंग : वळसंग येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री मायाक्कादेवी पालखी भेट सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. सुमारे एक हजार महिलांसह हजारो भाविकांच्या उपस्थितीने सोहळ्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले. ढोलवादन, सनई-पिपाणीचा निनाद आणि पारंपरिक नृत्यामुळे संपूर्ण वळसंग नगरी भक्तिमय झाली होती.

विविध गावांतून आलेल्या श्री मायाक्कादेवीच्या पालख्यांची पारंपरिक पद्धतीने भेट घडवून आणण्यात आली. पालख्यांचे आगमन होताच ढोल-वादन, सनई-पिपाणीचे सूर आणि पारंपरिक नृत्याने वातावरणात उत्साह संचारला. ‘मायाक्कादेवीच्या नावाने चांगभलं’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

या सोहळ्यानिमित्त श्री मायाक्कादेवी समितीच्यावतीने भाविकांसाठी महाप्रसाद व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पारंपरिक ओवी व सांग सादर कर ण्यासाठी कलाकारांना बोलावण्यात आले होते. त्यामुळे धार्मिक सोहळ्यासोबतच पारंपरिक लोककलेचे दर्शनही भाविकांना घडले.

पालखी भेटीच्या वेळी मोठी गर्दी असूनही दर्शन, पालखी भेट व धार्मिक कार्यक्रम सुरळीतपणे पार पडले. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी समितीचे पदाधिकारी, स्वयंसेवक व ग्रामस्थ दिवसभर कार्यरत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT