Fraud Case File Photo
सांगली

Sangli Fraud Case: सांगलीत वाहन विक्री व्यवहारात एकाची तीन लाखांची फसवणूक

वाहन विक्रीच्या व्यवहारातून पेठभाग परिसरातील एका तरुणाची ३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : वाहन विक्रीच्या व्यवहारातून पेठभाग परिसरातील एका तरुणाची ३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​विशाल जगदीश सबरद ( ४०, रा. गवळी गल्ली, पेठभाग, सांगली) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. पवन अरविंद पाटील (रा. कालिका मंदिराजवळ, एसटी स्टँड मागे, सांगली) आणि त्याचा मामेभाऊ विशाल विजय पाटील (रा. शाहूपुरी, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित पवन पाटील याने घरगुती कारणासाठी फिर्यादी विशाल सबरद यांच्याकडून रोख व ऑनलाइन प्रणालीद्वारे १ लाख ३० हजार रुपये हातउसने घेतले होते. पैसे परत मागितले असता, पवन व त्याचा मामेभाऊ विशाल पाटील यांनी स्वतःच्या ताब्यातील मोटार (एमएच ०९ सीएफ ८१६१) ३ लाख रुपयांत देण्याचे ठरवले. त्यानुसार फिर्यादींनी उर्वरित १ लाख ७० हजार रुपये रोख व ऑनलाइन स्वरूपात दिले.

​मात्र, नंतर ही मोटार कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात पोलिसांना हवी असल्याचे सांगून फिर्यादीच्या घरासमोरून नेली. पैसे आणि मोटार दोन्ही न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे विशाल यांच्या लक्षात आले. त्यांनी शहर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT