Sangli unseasonal rain Pudhari
सांगली

Sangli unseasonal rain: गारपिटीसह अवकाळीचा तडाखा

जिल्ह्यात अनेक ठिकाणी हजेरी : सांगली शहरात दोन तास वीज गूल

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रविवारी सायंकाळी गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सांगली, मिरज, वाळवा आणि तासगाव तालुक्यांत वादळी वारे आणि गारांसह मुसळधार अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वीजपुरवठा खंडित झाला.

सकाळपासून उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना या अवकाळीमुळे काहीसा दिलासा मात्र मिळाला. दरम्यान, आटपाडी तालुक्यात रात्री साडेआठ नंतर हलका पाऊस पडला. खानापूर, शिराळा आदी तालुक्यांत ढगाळ वातावरण होते; पण पाऊस पडला नाही. मिरज शहरात आणि तालुक्यातील काही गावांत पाऊस पडला. पलूस तालुक्यात सायंकाळी सातनंतर मुसळधार पाऊस पडला. पावसाबरोबरच जोरदार वारेही असल्याने मोठमोठे फलक फाटले.

सांगलीत अंधार

वीज कंपनीने सायंकाळी सहा वाजता वीजपुरवठा खंडित केला. रात्री आठ वाजले तरी वीजपुरवठा पूर्ववत केलेला नव्हता.

येथे कोसळली झाडे : शंभरफुटी रोड, नवीन वसाहत, खणभाग, मिरजेत वंटमुरे कॉर्नर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT