वांगी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्यावर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा परिणाम आता पर्यायी मार्गांवरही दिसू लागला होती. महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहनचालकांनी जुन्या सांगली-सातारा रस्त्याचा पर्याय स्वीकारला आहे. परिणामी, या रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली असून, रस्त्याला अक्षरशः महामार्गाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
किणी टोल नाक्यावरील शेतकरी आंदोलनामुळे पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा आधार घेतला होता. जुन्या सांगली-सातारा रस्त्यावरून वाहनांची संख्या अचानक वाढल्याने या मार्गावर वाहनांची मोठी रांग पाहायला मिळत होते. या मार्गावरून धावणाऱ्या नवनवीन प्रकारच्या वाहनांचे दर्शन पाहून स्थानिक नागरिकांमध्येही कुतूहल निर्माण झाले होते.
दरम्यान, पर्यायी रस्त्यावर वाहनांची संख्या वाढल्याने स्थानिक वाहतुकीवर ताण येत असून प्रवासाचा वेग मंदावला होता. या पार्श्वभूमीवर, जुन्या सांगली-सातारा रस्त्यावर वाढलेली वर्दळ लक्षात घेता पोलिस प्रशासनाने आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवून वाहतुकीचे नियमन करावे, अशी मागणी होत आहे.