सांगली : विश्वास संपादन करून रोख, ऑनलाइन आणि प्लास्टिक स्क्रॅप ग्राइंडर मशिनच्या स्वरूपात १३ लाख ७ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मिरज येथील निखिल नानासाहेब विटेकर (वय ३५, रा. राजे अकॅडमीजवळ, गुलमोहर कॉलनी, मिरज) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी व्यापारी अनिल धोंडिराम कोळेकर (वय ३९, रा. सद्गुरू कॉलनी, शामरावनगर, मूळ रा. अहिल्यानगर, विचारे मळा, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
हा प्रकार ४ जुलै ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत पटेल चौक, राजवाडा चौक आणि शामरावनगर परिसरात वेळोवेळी घडला. संशयित विटेकर याने फिर्यादी कोळेकर यांचा विश्वास संपादन केला.
बँकेत पैसे भरायचे आहेत तसेच इतर कारणे सांगून त्याने फिर्यादीकडून ३० जुलै २०२४ रोजी ८ लाख ५७ हजार रुपये आणि ५ एप्रिल २०२२ रोजी ४ लाख ५० हजार रुपये असे एकूण १३ लाख ७ हजार रुपये रोख, ऑनलाइन, आरटीजीएसद्वारे तसेच प्लास्टिक स्क्रॅप ग्राइंडर मशिनच्या स्वरूपात स्वीकारून फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.