तीन पोलिस पाटलांना भोवली खासगी नोकरी  
सांगली

Sangli News : तीन पोलिस पाटलांना भोवली खासगी नोकरी

शिरगाव, कुंभारगाव व सोहोलीचे पोलिस पाटील पदावरून बडतर्फ

पुढारी वृत्तसेवा

देवराष्ट्रे : कडेगाव तालुक्यातील शिरगाव, कुंभारगाव व सोहोली येथील पोलिस पाटील यांना खासगी नोकरी करणे चांगलेच भोवले. तीनही गावचे पोलिस पाटील हे पोलिस पाटील पदासह खासगी नोकरी करीत असल्याची तक्रार कडेगाव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी यांनी चौकशी करून तसेच अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर या प्रकरणामध्ये पोलिस पाटील हे खासगी नोकरी करीत असल्याचे निष्पन्न झालेने त्यांना पदावरून बडतर्फ करीत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी रणजित भोसले यांनी दिला आहे.

शिरगाव, कुंभारगाव व सोहोली येथील पोलिस पाटील शिवाजी तोडकर, सुभाष भिसे व रवींद्र चन्ने पोलिस पाटील पदासह साखर कारखान्यात नोकरी करीत असल्याने त्यांना पदावरून हटविण्यात यावे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते परशुराम काळे यांनी कडेगाव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केलेली होती.

फसवणुकीचा गुन्हा दाखल करा

महाराष्ट्र ग्राम अधिनियम 1967 नुसार पोलिस पाटलांना काही नियम घालून दिले आहेत. मात्र या नियमांची पायमल्ली करीत यांनी शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांनी घेतलेल्या रकमेची वसुली करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे तक्रारदार परशुराम काळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT