पाणीटंचाईच्या काळात हजारो लिटर पाणी वाया! 
सांगली

Sangli News : पाणीटंचाईच्या काळात हजारो लिटर पाणी वाया!

यंत्रणा कधी जागी होणार? हरिपूर-सांगली रस्त्यावर जलवाहिनीला गळती

पुढारी वृत्तसेवा

हरिपूर : येथील सांगली - हरिपूर रस्त्यावरील पिण्याच्या पाण्याच्या वाहिनीला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ऐन दुष्काळात पाणी टंचाईच्या काळात पाण्याची ही नासाडी वीस-पंचवीस दिवस झाले तरी सुरूच आहे.

एकीकडे शासनाकडून पाणी जपून वापरण्याचे आणि पाणी कपातीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. दुसरीकडे जलवाहिनीलाच गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. परिणामी हरिपूर आणि परिसरातील लोक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना, या गळतीकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून, पाणीटंचाईच्या काळात हा प्रकार चिंताजनक ठरत आहे.

गळती तातडीने थांबविण्याची मागणी

संबंधित पाणीपुरवठा विभागाने या लिकेजची तातडीने दखल घेऊन पाईपलाईनची दुरुस्ती करावी आणि पाण्याची गळती व नासाडी थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्याबरोबरच प्रशासनानेही पाणीगळती रोखण्यासाठी तत्परता दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT