file photo
सांगली

Sangli Theft: सांगलीत ट्रकचे १५ लाखांचे टायर चोरीला

सांगली रेल्वे स्टेशन परिसरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली रेल्वे स्टेशन परिसरात उभ्या असलेल्या एका ट्रकमधून अज्ञात चोरट्याने १५ लाख रुपये किमतीची २८ नवीन टायर चोरून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत चालक बाळासाहेब अर्जुन (वय ५१, रा. कामसे प्लॉट, कुपवाड, सांगली) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांचा ट्रक (एमएच ०९ सीक्यू ६८३६) १० ते १२ ऑगस्टदरम्यान सांगली रेल्वे स्टेशन येथे उभा होता. चोरट्याने ट्रकच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि ट्रकमधील १५ लाख रुपये किमतीची २८ नवीन टायर लांबवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT