Robbery  Pudhari
सांगली

Sangli Theft : कुपवाड येथे तीन लाखांची चोरी

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : शहरातील राणाप्रताप चौक (खारे मळा) येथील शीतल शामराव कोथळे यांच्या घरातील वरच्या मजल्यावर असलेल्या बेडरूमच्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून चोरट्यांनी कपाटातील २ लाख ७७ हजार ३५० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख १२ हजार रुपये , असा २ लाख ८९ हजार ३५० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी कुपवाड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शीतल कोथळे यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील बेडरूमच्या उघड्या दरवाजातून मंगळवारी दुपारी अडीच ते सव्वातीनच्या सुमारास चोरट्यांनी आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटात ठेवलेले ५५ हजार रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण, ३३ हजार ५०० रुपयांचा सोन्याचा नेकलेस, १ लाख १७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे वेढण व अंगठ्या, २३ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे कानवेल, ४७ हजार ७०० रुपयांचे चांदीचे दागिने आणि १२ हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख ८९ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला.

या घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT