सांगली : नाताळनिमित्त वापरण्यासाठी 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन नेली, अन् ती परत न करता लंपास केली. याप्रकरणी श्रेयस शिवाजी खाडे याने श्रीराज अमित मोहिते (वय 21, रा. विजयनगर, सांगली), हर्षल राकेश खाडे (वय 19) आणि अविष्कार अतुल भोरे (वय 19, दोघे रा. कवलापूर, ता. मिरज) या तिघांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.
तिघे संशयित हे फिर्यादी श्रेयस खाडे याच्या ओळखीचे आहेत. 5 डिसेंबररोजी तिघे कवलापूर येथे त्याच्या घराजवळ गेले. श्रीराज मोहिते याने श्रेयस याला ‘नाताळनिमित्त घरी कार्यक्रम आहे, त्यामुळे तुझी सोन्याची चेन वापरण्यासाठी दे’, अशी मागणी केली. 60 हजार रुपयांची चेन तिघे मिळून घेऊन गेले. परंतु नाताळ होऊन बरेच दिवस झालेतरी चेन परत केली नव्हती. श्रेयस याने वारंवार चेन परत देण्याची मागणी केली. परंतु तिघांनीही चेन देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने श्रेयस याने तक्रार दिली आहे.