Burglary Pudhari
सांगली

Sangli Burglary: आरगमध्ये घरफोडी; साडेचार ते पाच तोळे सोने लंपास

आरग (ता. मिरज) येथील कारखाना रोड, भोसले मळा परिसर आणि आसपासच्या भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे

पुढारी वृत्तसेवा

मिरज : आरग (ता. मिरज) येथील कारखाना रोड, भोसले मळा परिसर आणि आसपासच्या भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घराची संधी साधून चोरट्यांनी घर फोडून सुमारे साडेचार ते पाच तोळे सोने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे मिरज पूर्व भागात पुन्हा चोरटे सक्रिय झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कारखाना रोड, भोसले मळा येथील रहिवासी मोतीराम गुंडाप्पा कोरे हे काही वैयक्तिक कारणास्तव घराला कुलूप लावून गावी गेले होते. घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास कटावणीच्या साहाय्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सर्व साहित्य विस्कटले.चोरट्यांनी साडेचार ते पाच तोळे सोने असलेली पेटी पळवून नेली. चोरी केल्यानंतर त्यांनी कॅनॉलजवळ जाऊन ही पेटी फोडली आणि त्यातील सोने काढून घेऊन रिकामी पेटी तेथेच सोडून पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. तसेच चोरट्यांचा सुगावा लावण्यासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे. मिरज ग्रामीण पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT