रोहित पाटील 
सांगली

Sangli News : योगेवाडी-मणेराजुरी एमआयडीसीला 44.76 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

आमदार रोहित पाटील ः पायाभूत सुविधांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे, यासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. योगेवाडी-मणेराजुरी औद्योगिक क्षेत्राच्या विकासाने मोठा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मार्फत या औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी तब्बल 44 कोटी 76 लाख 35 हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती आमदार रोहित पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, या निर्णयामुळे परिसरातील औद्योगिक वाढीस गती मिळण्याबरोबरच रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. एमआयडीसीच्या प्राधिकरणाकडून सीई/पुणे/एए/696 या आदेशान्वये ही मंजुरी देण्यात आली आहे.या प्रकल्पाचा निव्वळ खर्च 38 कोटी 92 लाख 47 हजार रुपये असून, त्यामध्ये मूळ कामाचा खर्च 29 कोटी 69 लाख 12 हजार 500 रुपये आहे. यावर 1 टक्का कामगार विमा, 18 टक्के जीएसटी, 5 टक्के आकस्मिक खर्चासाठी तसेच 5 टक्के वाढीव शुल्कासाठी अतिरिक्त रक्कम समाविष्ट करण्यात आली आहे. ईटीपी शुल्कासाठी 15 टक्के अतिरिक्त निधी धरून एकूण 44 कोटी 76 लाख 35 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे. या कामासाठी सुधारित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात 2025-26 मध्ये 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2026-27 च्या अर्थसंकल्पात 14 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT