तासगाव तालुक्यात विवाहितेचा विनयभंग  (File Photo)
सांगली

Tasgaon Crime : तासगाव तालुक्यात विवाहितेचा विनयभंग

युवक राष्ट्रवादीच्या माजी तालुकाध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : तालुक्यातील एका गावातील 32 वर्षीय विवाहितेस वारंवार अश्लील व प्रेमाचे संदेश पाठवून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय सुभाष हावळे याच्याविरोधात तासगाव पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिला आपल्या कुटुंबासह तालुक्यातील एका गावात राहते. तिच्या कुटुंबामध्ये पती, तीन मुली आणि मुलगा असून, तिचे पती गेल्या पंचवीस वर्षांपासून गलाई व्यवसायानिमित्त परराज्यात वास्तव्यास आहेत. ते अधूनमधून गावाकडे येत असतात. पीडित महिला व दत्तात्रय हावळे यांची ओळख होती, या ओळखीचा गैरफायदा घेत हावळे याने संबंधित महिलेला मोबाईलवरून वारंवार मेसेज व कॉल करून त्रास देण्यास सुरुवात केली.

2 एप्रिल 2026 पासून दत्तात्रय हावळे हा रात्री-अपरात्री संबंधित महिलेला टेक्स्ट मेसेज व व्हॉट्सॲप संदेश पाठवत होता. 8 एप्रिल रोजी त्याने आपल्या मोबाईलवरून महिलेला अश्लील संदेश पाठवले. या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने 15 एप्रिल रोजी त्याचा व्हॉट्सॲप क्रमांक ब्लॉक केला. मात्र, त्यानंतरही हावळे याने तिचा पाठलाग व त्रास देणे सुरूच ठेवले. 17 मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याने पुन्हा मेसेज पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्यावर ये-जा करताना हातवारे करणे, पाठलाग करणे आणि लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अखेर हा मानसिक त्रास असह्य झाल्याने विवाहितेने तासगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT