Accident file photo
सांगली

Sangli Accident : तांदुळवाडी येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

कुरळप : तांदुळवाडी (ता. वाळवा) येथून येलूरच्या दिशेने जाणाऱ्या सेवा रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला. सद्दामहुसेन कलंदर नायकवडी (वय ३३, रा. कुंडलवाडी, ता. वाळवा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी गुलाब सिंकदर नायकवडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदेश सर्जेराव सरनाईक (वय २२, रा. सिद्धार्थनगर, कोल्हापूर) याच्यावर कुरळप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांदुळवाडी गावात महामार्गाच्या पश्चिम बाजूकडील सेवा रस्त्यावर ही दुर्घटना घडली. संदेश सरनाईक हा दुचाकीवरून (एमएच ०९ जीआर ७०२६) भरधाव वेगाने जात असताना, त्याने समोरून येणाऱ्या सद्दामहुसेन नायकवडी यांच्या दुचाकीला (एमएच १०, बीएल ५१२२) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नायकवडी यांच्या डोक्याला, तोंडाला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली.

दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. जखमी सद्दामहुसेन यांना तातडीने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातास आणि मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी संदेश सरनाईक याच्यावर कुरळप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक उपनिरीक्षक महादेव खोत करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT