सुरूलमध्ये वडिलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने मुलीचाही मृत्यू 
सांगली

Sangli incident : सुरूलमध्ये वडिलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने मुलीचाही मृत्यू

वडीलांनतर मुलीच्या निधनाने सुरुल गावात शोककळा

पुढारी वृत्तसेवा

कासेगाव : सुरुल (ता. वाळवा) येथील गणपती बंडू वायदंडे (वय 80) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. या धक्क्याने मुलगी सविता प्रेमानंद चव्हाण (वय 39, रा. कुंभारगाव, ता. पलूस) यांचेही निधन झाले.

गणपती वायदंडे यांचे निधन झाल्याचे समजताच सविता तातडीने कुटुंबासह सुरुलला आल्या. त्यांच्यासोबत पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार होता. सविता वडिलांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आल्या, मात्र वडिलांचे पार्थिव पाहताक्षणी त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या छातीत दुखू लागले. वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने सविता यांचे निधन झाले. वडील व मुलीच्या पाठोपाठ निधनाने सुरुल गावात शोककळा पसरली. गणपती वायदंडे यांच्या अंत्यविधीनंतर सविता यांचे पार्थिव कुंभारगाव येथे नेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT