पुरवठा विभागाचे छापे, 9 सिलेंडर जप्त 
सांगली

Sangli News : पुरवठा विभागाचे छापे, 9 सिलेंडर जप्त

तीन ठिकाणी दक्षता पथकांद्वारे कारवाई

पुढारी वृत्तसेवा

सांगली : टंचाई आणि जिल्ह्यात एलपीजी सिलेंडर इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी फिरत्या दक्षता पथकांचा पहारा ठेवण्यात येत आहे. या पथकांमार्फत सांगलीतील शामरावनगरात तीन ठिकाणांवर धाड टाकून तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये एकूण 9 सिलेंडर जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरगुती एलपीजी गॅसचे सुररण व्हावे तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता व फिरते पथक नियुक्त करण्यात आले आहे. गॅस एजन्सीकडून सिलिंडरचा गैरमार्गाने पुरवठा केल्याचे आढळल्यास अथवा घरगुती एलपीजीचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली सोळंखी, अन्न धान्य विभागाचे निरीक्षक राजू कदम आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT