सांगली

Sangli Farmers Protest : ऊस दर आंदोलनाला मिरजपूर्व भागात हिंसक वळण

मल्लेवाडी, लक्ष्मीवाडी येथे ट्रॅक्टर पेटविले; अज्ञातांविरोधात गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

मिरज : ऊस दराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मिरजपूर्व भागात हिंसक वळण लागले आहे. मिरजपूर्व भागात मल्लेवाडी फाटा ते आरग रस्त्यावरील शाबू फॅक्टरी परिसरात तसेच लक्ष्मीवाडी ते बेडग रस्त्यावरील लक्ष्मीवाडी चौकात आंदोलकांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरना आग लावली. या आगीत ऊस, ट्रॉलीतील साहित्य आणि ट्रॅक्टरच्या काही भागांचे मिळून सुमारे एक लाख पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दि. २५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास या घटना घडल्या.

आगीच्या या घटनांमध्ये ट्रॅक्टरला (क्र. केए २९ टीबी ५४२२) जोडलेल्या (केए २३ टीबी ६६४० आणि केए २३ टीबी ६६३९) ट्रॉलीतील ऊस, लाकडी खांब व वायररोप जळाले. तसेच एमएच २३ बीसी ४६०४, एमएच १० डीएल २२२४ आणि एमएच १० ईके ९८५७ क्रमांकांच्या ट्रॅक्टरचे हूड, टेपरेकॉर्डर व सीटचे नुकसान झाले आहे. अज्ञात तीन ते चार व्यक्तींनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतील उसाला व ट्रॅक्टरमधील साहित्याला आग लावल्याची तक्रार मिरज ग्रामीण पोलिसांत देण्यात आली असून, हवालदार विशाल जाधव यांनी याप्रकरणी नोंद केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT