fraud Pudhari
सांगली

Sangli Fraud : शेगडी दुरुस्तीच्या बहाण्याने प्राध्यापिकेस लाखाचा गंडा

सायबर चोरट्याने मोबाईल हॅक करून तब्बल ९९ हजार ५ रुपये लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला

पुढारी वृत्तसेवा

सांगली : घरगुती शेगडी दुरुस्त करण्यासाठी गुगलवरून कस्टमर केअरचा क्रमांक शोधून संपर्क साधणे एका निवृत्त प्राध्यापिकेला चांगलेच महाग पडले आहे. सायबर चोरट्याने मोबाईल हॅक करून तब्बल ९९ हजार ५ रुपये लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १०० फुटी रोडवरील मधुबन कॉलनी येथील रहिवासी अंजू नितीन साडीकर (वय ६४) यांनी घरगुती शेगडी दुरुस्तीसाठी गुगलवरून संबंधित कंपनीचा कस्टमर केअर क्रमांक शोधून त्यावर संपर्क साधला होता. त्यावेळी तंत्रज्ञ पाठवण्याचे आमिष दाखवत संशयिताने साडीकर यांचा मोबाईल हॅक केला.त्यानंतर फिर्यादीच्या संमतीशिवाय त्यांच्या गुगल पे अकाउंटचा पासवर्ड आणि आयसीआयसीआय बँकेचे खाते हॅक करून वेगवेगळ्या खात्यांवर टप्प्याटप्प्याने ९९ हजार ५ रुपये ट्रान्सफर केले.

कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवून चोरट्याने ही फसवणूक केली. याप्रकरणी अंजू साडीकर यांच्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक भालेराव अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT