Molestation Pudhari
सांगली

Sangli Crime : एसटी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग; लेखाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

महिला कर्मचाऱ्यास अश्लील मेसेज पाठवून विनयभंग

पुढारी वृत्तसेवा

सांगली : येथील एसटी महामंडळाच्या महिला कर्मचाऱ्यास अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी लेखाधिकारी संदीप आप्पा फौंडे (वय ४०, रा. माधवनगर) याच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची माहिती मध्यवर्ती एसटी प्रशासनाला पाठविल्याचे विभाग नियंत्रक सुकन्या साठे यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप फौंडे याने प्रथम संबंधित महिला कर्मचाऱ्यास सोशल मीडियावर अश्लील मेसेज पाठवले. या प्रकारानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याने थेट शहर पोलिसात तक्रार नोंदवली. दरम्यान, पीडितेने कार्यालयीन दक्षता समितीकडे याविषयी तक्रार केलेली नाही.

मात्र, पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची अधिकृत माहिती एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली असून, पुढील कारवाईबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT