Leopard Pudhari
सांगली

Leopard Terror Sangli: सोनवडे येथे बिबट्याचा धुमाकूळ

शेडमध्ये घुसून १५ कोंबड्या फस्त : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

वारणावती : शिराळा तालुक्यातील सोनवडे गावात भरवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बिबट्याने येथील सचिन नथुराम पाटील यांच्या घरामागील शेडमध्ये घुसून पिलांसह १५ हून अधिक कोंबड्या फस्त केल्या.

सोनवडे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. सचिन पाटील यांच्या घराच्या परिसरात यापूर्वीही बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले होते. रविवारी झालेल्या हल्ल्यात शेडच्या भिंतीवर बिबट्याच्या नखांचे ठसे स्पष्टपणे उमटले असून परिसरातही हालचालींचे पुरावे मिळाले आहेत. काही दिवसांपूर्वी गावातील दीपक बाबर यांचा पाळीव कुत्राही बिबट्याने ठार केला होता. त्यामुळे पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.

या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सोनवडे येथे भेट देऊन पाहणी केली, तसेच नुकसानीचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. बिबट्याचे हल्ले वाढू लागल्याने वन विभागाने तातडीने उपाययोजना करून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT