सांगली

Vishwas Sapkal : सांगलीचा सुपुत्र स्लोव्हाकियाचा राजदूत

विश्वास सपकाळ यांची नियुक्ती; रशिया, अमेरिकेतही केले प्रतिनिधीत्व

पुढारी वृत्तसेवा

सांगली : भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) अधिकारी आणि सांगलीचे सुपुत्र विश्वास सपकाळ यांची मध्य युरोपातील स्लोव्हाकियातील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. रशिया, अमेरिका, इजिप्त, फिजी आणि पेरू या देशात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.

विश्वास सपकाळ हे १९९८ च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. त्यांच्या प्रदीर्घ राजनैतिक अनुभवाची दखल घेत भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांची स्लोव्हाकियातील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. ते लवकरच नवीन पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. सांगलीच्या भूमीतून घडलेले विश्वास सपकाळ यांनी आपल्या कर्तृत्व, बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर भारतीय परराष्ट्र सेवेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नवीन नियुक्तीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी केंद्रीय जीएसटीचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर, उपजिल्हाधिकारी (नि.) रवींद्र खाडे, पोलिस उपअधीक्षक (नि.) के. एन. पाटील, उपजिल्हाधिकारी मुद्रांक (नि.) धनंजय जोशी, उपसंचालक, वित्त सेवा (नि.) प्रकाश कोळेकर, उपअभियंता (नि.) संग्रामसिंह हराळे-भोसले, राज्य जीएसटी उपायुक्त (नि.) किरण रसाळ, एकलव्य अकॅडमी संचालक शहाजी शिंदे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT