स्वयंपाक न केल्याने आईला काठीने बेदम मारहाण File Photo
सांगली

Sangli : स्वयंपाक न केल्याने आईला काठीने बेदम मारहाण

एरंडोलीमधील घटना : मुलाविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मिरज : एरंडोली (ता. मिरज) येथे जेवण न बनविल्याच्या कारणातून आईला मुलाने बेदम मारहाण केली. याप्रकरणी अलकाबाई शिवाजी पाटील (वय 65) यांनी मुलगा संतोष ऊर्फ भारत शिवाजी पाटील याच्याविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी, अलकाबाई आणि त्यांचा मुलगा संतोष हे दोघे एरंडोली येथे राहतात. अलकाबाई या आजारी होत्या, त्यामुळे त्यांनी शुक्रवारी (दि. 4) रात्री स्वयंपाक बनविला नव्हता. संतोष हा रात्री घरी आल्यानंतर त्याला जेवण तयार नसल्याचे दिसले. याबाबत त्याने आईला जाब विचारला. आईने आजारी असल्याने जेवण बनविले नाही, असे सांगितले. याचा संतोष याला राग आला. त्याने अलकाबाई यांना काठीने आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. अलकाबाई यांच्या फिर्यादीनुसार संतोष याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT