Fraud Case 
सांगली

Sangli Fraud Case : सावळी येथे शेतगडी दाम्पत्याकडून पावणेदोन लाखांची फसवणूक

सावळी (ता. मिरज) येथील एका शेतगडी म्हणून कामास असलेल्या दाम्पत्याने शेतमालकाचा १ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : सावळी (ता. मिरज) येथील एका शेतगडी म्हणून कामास असलेल्या दाम्पत्याने शेतमालकाचा १ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी कुपवाड पोलिस ठाण्यात संशयित दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीकृष्ण जांबुराव माळी (वय ५२, रा. माळी गल्ली, सांगली) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संभाजी बाबुराव भोसले व सुनीता संभाजी भोसले (दोघे मूळ रा. कसबे डिग्रज, सध्या रा. सावळी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित दांपत्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीकृष्ण माळी यांची सावळी येथे शेतजमीन आहे. शेतातील कामे, जनावरांची देखभाल करणे व तेथेच राहण्यासाठी त्यांनी भोसले दाम्पत्याची शेतगडी म्हणून नेमणूक केली होती. २७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संशयित भोसले दाम्पत्याने शेतातील १ लाख १० हजार रुपये किमतीची म्हैस, ५ हजार रुपयांचा तांब्याचा बंब, दीड हजार रुपयांची चार मोठी पातेली, दीड हजार रुपयांचे गॅस सिलेंडर आणि ५० हजार ५०० रुपये रोख, असा १ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर माळी यांनी कुपवाड पोलिसात तक्रार दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT