Crime News Pudhari
सांगली

Sangli Crime : सराटी येथे जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण

एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ ः सराटी (ता. कवठेमहांकाळ) येथे शेतजमिनीच्या वादातून महिलेला लाथा-बुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. हल्ल्यात सविता ज्ञानेश्वर अभंगराव (रा. सराटी) या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी कोंगनोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार, दि. 10 रोजी सायंकाळी ही घटना घडली.

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सविता अभंगराव या सराटी येथील गट नंबर 170 मधील आपल्या शेतात कडवळ पिकाला पाणी पाजत होत्या. यावेळी संशयित सुभाष कृष्णा अभंगराव, चंद्रभागा सुभाष अभंगराव, निर्मला कुंडलिक अभंगराव आणि कुंडलिक सुभाष अभंगराव (सर्व रा. कोंगनोळी) तिथे आले. मारहाणीत सविता या गंभीर जखमी झाल्या. त्यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेची तत्काळ दखल घेत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

रक्तबंबाळ...

‌‘आमच्या हिश्श्याचे पाणी पाजायचे नाही, तुला प्रॉपर्टीत हिस्सा मिळणार नाही, तू तुझ्या मुलांना घेऊन येथून निघून जा‌’, असे म्हणत त्यांनी सविता यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या चौघांनी सविता यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तसेच दगडाने त्यांच्या डोक्यावर आणि डाव्या हातावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात सविता गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT