Sangli News: सत्ताधारी - विरोधक भिडले! Pudhari
सांगली

Sangli News: सत्ताधारी - विरोधक भिडले!

ईश्वरपुरात रस्ता कामाच्या उद्घाटनावरून वादावादी

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : येथील प्रभाग क्रमांक 7 मधील रस्ता पॅचवर्क कामाच्या उद्घाटनावरून विरोधी शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार व सत्ताधारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक संग्रामसिंह पाटील यांच्यात जोरदार वादावादी झाली. यामुळे या परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्याहस्ते नारळ फोडून कामाचा प्रारंभ करत वादावर पडदा टाकण्यात आला.

गुरुवारी शहरातील मंत्री कॉलनी परिसरात रस्त्याच्या पॅचवर्क व डांबरीकरणाच्या कामाचा प्रारंभ करण्याची तयारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. कामासाठी सर्व यंत्रणाही तयार होती. मात्र हे काम आम्ही दोन दिवसापूर्वीच सुरू केले आहे. ते काम आधी पूर्ण झाले पाहिजे, असे म्हणत सत्ताधारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक संग्रामसिंह पाटील यांनी या उद्घाटनावर आक्षेप घेतला. त्यामुळे पवार व पाटील यांच्यात उद्घाटनावरून जोरदार वादावादी झाली.

नगरसेवक अमित ओसवाल, राजवर्धन पाटील यांनी मध्यस्थी करत हा वाद थांबविला. तोपर्यंत दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते घटनास्थळी जमले होते. त्यानंतर या कामाचा प्रारंभ नगराध्यक्ष यांच्याहस्ते करण्यावर दोन्ही बाजूकडून एकमत होऊन कामाचे उद्घाटन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT