Sangli Accident News 
सांगली

Sangli Accident : रस्त्याकडेला उभ्या असलेल्या तरुणांना टेम्पोची धडक

एक जागीच ठार, तिघे गंभीर

पुढारी वृत्तसेवा

शिराळा : कोकरूड-शिराळा मार्गावर रिळे (ता. शिराळा) गावच्या हद्दीत रस्त्याकडेला उभ्या असलेल्या तरुणांना टेम्पोने जोराची धडक दिली. त्यात योगेश दिलीप पाटील (वय 35, रा. रिळे) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 3) दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालक अभिजित तानाजी कडवेकर (रा. जांभळेवाडी, ता. शिराळा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी महेश पाटील हे भाऊ योगेश पाटील, आशिष पाटील, विशाल पाटील आणि सचिन पाटील यांच्यासोबत कोकरूड-शिराळा रोडलगत बोलत उभे होते. यावेळी कोकरूड दिशेकडून शिराळ्याकडे जाणारा टेम्पो (एमएच 10, बी आर 2298) वरील चालक अभिजित कडवेकर याने या तरुणांना जोरदार धडक दिली. या धडकेत योगेश पाटील याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT