Accident Pudhari
सांगली

Sangli Accident : मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

कसबे डिग्रज फाट्यावरील प्रकार

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली - ईश्वरपूर रस्त्यावर कसबे डिग्रज फाट्यावर रस्ता ओलांडून गावात येणाऱ्या दुचाकीला मोटारीने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे ठार झाले. प्रतीक श्रीकांत आंबी (वय 25) व राज श्रीकांत जाधव (25, दोघे रा. कसबे डिग्रज, ता. मिरज) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरा नोंद झाली आहे.

अधिक माहिती अशी, आंबी व जाधव हे दोघे समडोळी रस्त्यावरील एका वर्कशॉपमध्ये नोकरीस होते. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास काम आटोपल्यानंतर ते दुचाकी (एमएच 10, इटी 1144) वरून कसबे डिग्रजकडे येत होते. सांगली ते ईश्वरपूर रस्त्यावर दोघे आले असता, सांगलीहून आष्ट्याकडे जाणाऱ्या मोटारीने (एमएच 10, डीटी 7707) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील प्रतीक व राज हे दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी दोघांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू असताना रात्री दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर कसबे डिग्रज कमानीसमोर नागरिकांची गर्दी जमली होती. सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पंचनामा केला. मध्यरात्रीपर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT