Accident  
सांगली

Sangli Accident : दुचाकी-कारच्या धडकेत 17 वर्षीय मुलाचा मृत्यू

आटपाडीतील अंबाबाई ओढा पात्र परिसरातील घटना

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी ः आटपाडी शहरातील अंबाबाई ओढा पात्र परिसरात झालेल्या अपघातात 17 वर्षीय पार्थ दादासाहेब डोईफोडे या युवकाचा मृत्यू झाला.

ब्राम्हण गल्ली येथून दोन युवक दुचाकी (एमएच 10सीके 7248) वरून ओढापात्रातील रस्त्यावरून घरी जात होते. दरम्यान, राजारामबापू हायस्कूल ते बाजार पटांगण या मार्गावरून येणाऱ्या कारशी (एमएच 03 डब्ल्यू 1462) त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. त्यात दुचाकीवर मागे बसलेला पार्थ गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी तातडीने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सांगली येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. दुचाकी चालवणारा अभिषेक धनंजय सुतार (वय 27, रा. आटपाडी) हा किरकोळ जखमी झाला.

अंबाबाई ओढापात्रातील ब्राम्हण गल्ली ते आंबेबन मळा तसेच राजारामबापू हायस्कूल ते बाजार पटांगण यादरम्यानच्या चौकात वाहतुकीची मोठी वर्दळ असते. वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT