पोलिस अधीक्षक तुषार दोशी 
सांगली

Sangli News : गणेशोत्सव मिरवणुका, कार्यक्रमात मुखवटे वापरण्यास निर्बंध

जिल्ह्यात २१ ते २६ सप्टेंबरदरम्यान आदेश लागू

पुढारी वृत्तसेवा

सांगली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच हा सण शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सांगली जिल्ह्यात गणेशोत्सवातील मिरवणुका, कार्यक्रम व सार्वजनिक ठिकाणी विशिष्ट प्रकारचे मुखवटे वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी याबाबत आदेश जारी केला.

गणेशोत्सव काळात देखावे पाहण्यासाठी महिला, मुले, वृद्ध व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. काही व्यक्ती राक्षस, भूत, देव, दानव तसेच विविध प्राण्यांचे मुखवटे घालून देखावे पाहण्यासाठी अथवा मिरवणुकीत सहभागी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा मुखवट्यांमुळे लहान मुले, वृद्ध व नागरिकांमध्ये भीती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच काही समाजकंटक किंवा रेकॉर्डवरील गुन्हेगार ओळख लपविण्यासाठी त्याचा गैरवापर करू शकतात.

मिरवणुका, कार्यक्रम, सार्वजनिक ठिकाणे, मार्ग व रस्त्यांवर व्यक्ती किंवा सार्वजनिक मंडळांच्या सदस्यांना देखावे पाहताना अथवा मिरवणुकीत सहभागी होताना राक्षस, भूत, देव, दानव तसेच विविध प्राण्यांचे मुखवटे वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT