तापमानात घट झाल्यामुळे पहाटेच्या वेळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. file photo
सांगली

Sangli News| सांगलीत कमाल ३१, किमान १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

पहाटेच्या वेळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या

पुढारी वृत्तसेवा

सांगली : थंडीचा जोर वाढू लागला असून रात्री आणि पहाटेच्या तापमानात लक्षणीय घट होत आहे. दिवाळीनंतर कमाल तापमानात ५, तर किमान तापमानात ६ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. शुक्रवारी सांगली शहराचे किमान तापमान पहाटे पाच वाजता १३ अंश सेल्सिअस, तर दुपारी कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.

उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रात्री आणि पहाटे चांगलाच गारवा जाणवत आहे. तापमानात घट झाल्यामुळे पहाटेच्या वेळी ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. दुसरीकडे दिवसा हवामान कोरडे व उष्ण राहताना दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT