Ration Shopkeepers 
सांगली

Ration Shopkeepers Strike: थकीत कमिशनसाठी रेशन दुकानदार १ जुलैपासून संपावर

रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे इशारा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : रेशन दुकानदारांचे तीन महिन्यापासून कमिशन थकीत असून हे न मिळाल्यास १ जुलैपासून धान्य वाटप बंद करण्यात येईल, असा इशारा रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, फेब्रुवारी २०२६ पासून रेशन दुकानदारांचे कमिशन थकीत आहे. हे कमिशन त्वरित वितरित करण्यात यावे, अन्यथा धान्य वाटप बंद करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मे २०२६ मध्ये दुकानामध्ये धान्य लवकर व वेळेत पोहोच झाले नाही, त्यामुळे धान्य वाटप झाले नाही. या धान्याच्या वाटपासाठी एक महिना मुदतवाढ मिळावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी सांगली जिल्हा रेशन संघटनेचे अध्यक्ष दीपक उपाध्ये यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT