सांगली : अतिवृष्टी आणि नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे 51 हजार 386 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 96 हजार 186 शेतकर्यांना फटका बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरु केले आहेत.
महिन्याभरात अतिवृष्टी आणि नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने 291 गावांना पावसाचा फटका बसला. यामुळे 96 हजार 186 शेतकर्यांच्या 51 हजार 386 हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली. शासनाकडून पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल देण्याचे आदेश कृषी विभागाला आले आहेत. त्यानुसार पंचनामे सुरु असून, काही ठिकाणी पाणी ओसरल्यानंतर पंचनामे करावे लागणार आहेत. त्यानंतर नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी अधीक्षक विवेक कुंभार यांनी दिली.