सांगली; पुढारी वृत्तसेवा : प्रेमविवाह व पूर्ववैमनस्यातून वाल्मिकी आवासमधील कॅरम क्लबमध्ये राडा झाला. याप्रकरणी दोघे जखमी झाले आहेत. सहा जणांविरुद्ध परस्पर विरोधी फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
मारामारी प्रकरणी सोहेल जावेद शेख याने ऋषीकेश दिनकर गवळे (वय 24) आणि सिद्धराज दिनकर गवळे (वय 29) यांच्याविरद्ध तर सिद्धराज दिनकर गवळे याने आरबाज माजगावकर, साहेल शेख इम्रान शेख, रमजान शेख (सर्व रा. वाल्मिकी आवास, सांगली) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सिद्धराज व ऋषीकेश या दोघांना अटक करण्यात आली आहे.
सिद्धराज गवळे याच्या फिर्यादीनुसार, सिद्धराज व त्याचा भाऊ ऋषीकेश हे दोघे आरबाज माजगावकर याच्या कॅरम क्लबमध्ये कॅरम खेळत होते. यावेळी आरबाज याने त्याच्या बहिणीशी ऋषीकेश याने प्रेम विवाह केल्याच्या रागातून 'तुला मस्ती आली आहे, तुला बघून घेतो', असे म्हणून आरबाज माजगावकर, सोहेल शेख, इम्रान शेख आणि रमजान शेख या चौघांनी ऋषीकेश याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरबाज याने ऋषीकेश याच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मध्यस्थी केल्याने सिद्धराज जखमी झाला.
त्याला ठेवत नाही…
सोहेल शेख याच्या फिर्यादीनुसार, आरबाज याच्यासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून ऋषीकेश व सिद्धराज हे दोघे आरबाज याच्या कॅरम क्लबमध्ये आले. त्यांनी 'आरबाज कोठे आहे, त्याला ठेवत नाही', असे म्हणून कोयत्याने कॅरमबोर्डवर मारून नुकसान केले. तसेच क्लबमधील लोकांना हत्याराची भीती दाखवून गळ्यातील 1 हजार 730 रुपयांचे दागिने चोरून नेले. तसेच आरबाज राहत असलेल्या घरात घुसून कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ करून दहशत निर्माण केल्याचे म्हटले आहे.