Sangli primary schools FIle Photo
सांगली

Sangli primary schools : प्राथमिक शाळा उद्यापासून सकाळ सत्रात

शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड; शिक्षक संघटनांच्या मागणीला यश

पुढारी वृत्तसेवा

सांगली : उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्व तसेच खासगी प्राथमिक शाळा सकाळ सत्रात भरवा, अशी मागणी शिक्षक संघ, जुनी पेन्शन संघटनांच्यावतीने जिल्हा परिषद प्रशासनाकडे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत सोमवारपासून (दि. 9) शाळा सकाळ सत्रात भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिल. सकाळी सात ते पावणेबारा अशी शाळेची वेळ राहणार आहे.

सध्या जिल्ह्यात तापमान वेगाने वाढत आहे. दुपारच्या कडक उन्हाचा सर्वाधिक फटका प्राथमिक शाळांतील लहान विद्यार्थ्यांना बसत आहे. दुपारच्या सत्रात शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांना उष्माघात, डोकेदुखी, अशक्तपणा, चक्कर येणे यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागण्याची भीती आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी 1 मार्चपासून जिल्ह्यातील सर्व

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व खासगी प्राथमिक शाळा सोमवारपासून सकाळ सत्रात भरविण्यास मान्यता दिली आहे. शाळेची वेळ सकाळी 7 ते 11.45 अशी राहील. आरटीई 2009 नुसार विहित मुदतीत सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्याची तसेच आवश्यक तासिका पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक व शिक्षकांची राहील. सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या खासगी प्राथमिक शाळांनाही लागू राहील, असेही आदेशात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT