संजय पाटील  File Photo
सांगली

Sanjay Patil : माजी खासदार संजय पाटील यांचा ३० रोजी भाजपात प्रवेश

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

सांगली : माजी खासदार संजय पाटील यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून, विकासाच्या मुद्द्यावर त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. येत्या ३० जून रोजी त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, संजय पाटील आणि आमच्यात कोणतेही मतभेद राहिलेले नाहीत. त्यांच्यारूपाने भाजपला एक अनुभवी आणि जनाधार असलेला नेता मिळणार असून, त्यांचे पक्षात स्वागत आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत मी अनेकदा सांगितले होते की, ते स्वतः संजय पाटील यांचे योग्य राजकीय पुनर्वसन करतील आणि त्यावेळीही मला त्याबाबत विश्वास होता. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत संजय पाटील यांची इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपमध्ये येण्याची अधिक असल्याचे स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT