विटा : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, असा सूर आळवत असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह डझनभर नेत्यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार सुहास बाबर आणि त्यांचे बंधू अमोल बाबर यांच्याशी सविस्तर चर्चा करून शिंदे गटाच्या सांगली जिल्ह्यातील मतांबाबत 'पट्टी' पडल्याची माहिती मिळाली आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीला अवघे पाच दिवस उरले असताना आज शनिवारी कराड येथील महायुतीच्या नेत्यांची बैठक आटो पून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पालक मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार निरंजन डावखरे, सांगली-सातारा विधानपरिषदेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम, भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, सम्राट महाडीक, पृथ्वीराज पाटील यांनी थेट विट्यातील आमदार सुहास बाबर यांचे निवासस्थान गाठले. इकडे आजच जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व मतदारांची बैठक विटा येथील सुरभी स्टुडिओ वरती आयोजित करण्यात आली होती. परंतु ती पुढे ढकलण्यात आली.
दरम्यान भाजपच्या सर्व नेते मंडळांनी आज विटा येथे येऊन आमदार बाबर यांच्याशी निवडणुकी संदर्भात चर्चा केली. यावेळी विटा नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर हे उपस्थित होते. बाबर बंधूंशी चर्चा झाल्यानंतर भाजपा नेत्यांचा ताफा विट्याच्या एका मोठ्या हॉटेलकडे वळला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी खासदार संजय पाटील व त्यांचे समर्थक मतदार उपस्थित होते. त्यांच्याशीही भाजप नेत्यांनी सकारात्मक चर्चा केली. या ठिकाणी जिल्ह्यातील आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सदाशिव राव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर उपस्थित होते. यानंतर माजी नगरा ध्यक्ष वैभव पाटील यांच्या आदर्श शैक्षणिक संकुल येथे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासह सर्व भाजप नेते गेले. तिथेही या निवडणुकीबाबत चर्चा झाली.
या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीतील (विशेषतः भाजपच्या) कार्यपद्धतीवर नुकतीच तीव्र नाराजी व्यक्त करत या निवडणुकीत आम्हाला प्रचाराच्या बैठकांसाठी निमंत्रण मिळत नाही, त्यामुळे "आमची अवस्था 'येऊ नको, तर कुठल्या गाडीत बसू' अशी झाली आहे," असे परखड विधान केले होते. परिणामी या विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या भाजपा आणि शिंदे गट या प्रमुख दोन घटक पक्षांमध्ये बेबनाव झाल्याची चर्चा रंगत असता नाच आज अचानक भाजपाने त्यांनी स्वतंत्रपणे बाबर बंधूंची भेट घेतल्याने राजकीय विश्लेषकां च्या भुवया उंचावल्या आहेत.