‘डायल ११२’ सेवेत सांगली पोलिस राज्यात प्रथम! 
सांगली

Sangli News : ‘डायल ११२’ सेवेत सांगली पोलिस राज्यात प्रथम!

४ मिनिटे ११ सेकंदात मदतीसाठी पोलिस घटनास्थळी

पुढारी वृत्तसेवा

सांगली : नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत उपलब्ध करून देणाऱ्या 'डायल ११२' या सेवेत सांगली पोलिस दलाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जुलै महिन्यात प्राप्त झालेल्या सर्वच्या सर्व ३,३४१ कॉल्सवर तातडीने कारवाई करत, अवघ्या ४ मिनिटे ११ सेकंदाच्या विक्रमी सरासरी प्रतिसाद वेळेसह (रिस्पॉन्स टाईम) सांगली पोलिसांनी हे यश संपादन केले आहे. एकही कॉल प्रलंबित राहिला नाही, हे या कामगिरीचे वैशिष्ट्य ठरले.

आधुनिक तंत्रज्ञान, जीपीएस प्रणाली, मोबाईल डेटा टर्मिनल (एमडीटी) आणि अत्याधुनिक नियंत्रण कक्षाच्या मदतीने आपत्कालीन संदेश मिळताच सर्वात जवळ असलेल्या पोलिसांच्या वाहनाला सूचना देऊन नागरिकांपर्यंत अत्यंत वेगाने मदत पोहोचवण्यात आली.

कधी कॉल करता येतो ?

'डायल ११२' वर खालील प्रसंगी मदत मागावी...

रस्ते अपघात, मारामारी, चोरी, दरोडा व गुन्हेगारी घटना

महिला व बालकांवरील अत्याचार

आगीच्या घटना व वैद्यकीय आपत्कालीन मदत

संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आणि नैसर्गिक आपत्ती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT