दोघा फरारी संशयितांना अटक  
सांगली

Sangli News : दोघा फरारी संशयितांना अटक

पलूस पोलिसांची कारवाई ः संबंधित पोलिस ठाण्यांच्या दिले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

पलूस : विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या फसवणूक व विश्वासघात प्रकरणांतील फरार आरोपींना पलूस पोलिसांनी शोधून काढत अटक केली. त्यांना पुढील तपासासाठी संबंधित पोलिस पथकांच्या ताब्यात दिले आहे.

सांगली ग्रामीण पोलिस ठाणे येथे फसवणूक दाखल गुन्ह्यातील आरोपी आकाश शिवाजी जाधव (रा. तुपारी, ता. पलूस) हा पलूस पोलिस ठाणे हद्दीत असल्याची माहिती तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी दिली होती. त्यानुसार पलूस पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार प्रवीण पाटील, पोलिस हवालदार शशिकांत माळी, पोलिस अंमलदार विनोद अडसूळ, पोलिस अंमलदार अमोल कदम तसेच पीएसआय राजेंद्र माळी यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी आरोपीस सपोफौ मेघराज विलास रुपनर व सुनील शिंदे (सांगली ग्रामीण पोलिस ठाणे) यांच्या ताब्यात सुस्थितीत देण्यात आले.

तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूपुरी पोलिस ठाणे येथे शेअर मार्केट फसवणूक गुन्ह्यातील फरार आरोपी संतोष नंदकुमार कुंभार (रा. दत्तनगर, ता. पलूस) याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस हवालदार शशिकांत माळी यांनी केली. पुढील तपासासाठी आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर येथील पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलिस हवालदार अमित सर्जे, युवराज पाटील यांच्या ताब्यात सुस्थितीत देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT