Crime News (File Photo)
सांगली

Sangli Crime : सराईत गुन्हेगार सौरभ पोतदारच्या आवळल्या मुसक्या

कोयत्याच्या धाकाने पोतदार टोळीने केली होती लूटमार; एक अल्पवयीन अद्याप पसार

पुढारी वृत्तसेवा

मिरज : शहरातील ब्रदर्स अड्डा या कॅफे चालकास लुटणाऱ्या सौरभ पोतदार या सराईत गुन्हेगारास मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून एक अल्पवयीन गुन्हेगार पसार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात असणाऱ्या ब्रदर्स अड्डा या कॅफेचे संचालक चिदंबर शिंदे यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या गल्ल्यातील 2 हजार 900 रुपये सौरभ पोतदार व त्याच्या टोळीने जबरदस्तीने काढून घेतले होते. तसेच चिदंबर शिंदे यांना जिवे मारण्याचीही त्याने धमकी देत कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करून पलायन केले होते. याची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण चौगले यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरणचे सहायक निरीक्षक भैरवनाथ पाटील व त्यांच्या पथकाने ओंकार साळुंखे व सार्थक जाधव या दोघांना अटक केली होती. परंतु टोळीचा म्होरक्या सौरभ पोतदार व त्याचा एक साथीदार पसार होता. सौरभ पोतदार याला मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्याच्या मुसक्या आवळत अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT