Fraud Pudhari file photo
सांगली

Sangli Crime: पेट्रोल पंप मॅनेजरकडून २६ लाखांचा अपहार

आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

​आष्टा : केदारलिंग किसान सेवा केंद्र या पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने मालकाचा विश्वासघात करत तब्बल २६ लाख ३ हजार २७० रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तौफिक इसाक मुल्ला (रा. बागणी, ता. वाळवा) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी पेट्रोल पंप चालवणाऱ्या सुवर्णा राजाराम माने (वय ४८, रा. गणेशनगर, सांगली) यांनी आष्टा पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित तौफिक मुल्ला हा फिर्यादी सुवर्णा माने यांच्या केदारलिंग किसान सेवा केंद्रावर मॅनेजर म्हणून कार्यरत होता. १ मे २०२३ ते ९ जानेवारी २०२४ या कालावधीत त्याने पेट्रोल पंपावरील दैनंदिन आर्थिक व्यवहारांमध्ये आणि बँक खात्यांच्या नोंदीत फेरफार केला.

संशयिताने १ मे २०२३ ते ९ जानेवारी २०२४ या कालावधीत क्रेडिट कार्डद्वारे ९० लाख ४० हजार १६४ रुपये जमा झाल्याची नोंद पंपाच्या नोंदवहीत केली होती. मात्र, प्रत्यक्ष बँक खात्यात ७१ लाख ५३ हजार ९७७ रुपयेच जमा झाले होते. या व्यवहारात १८ लाख ८६ हजार १८६ रुपयांची तफावत आढळली. तसेच ऑनलाईन स्वरूपात नोंदवहीत २७ लाख ५८३ रुपये जमा दाखवले होते; परंतु प्रत्यक्ष खात्यात १९ लाख ८३ हजार ४९९ रुपये जमा होते. ऑनलाईन व्यवहारांत ७ लाख १७ हजार ८४ रुपयांची तफावत आढळली.

मॅनेजरने क्रेडिट कार्ड व ऑनलाईन व्यवहारांतील तफावतीच्या माध्यमातून एकूण २६ लाख ३ हजार २७० रुपयांची फसवणूक केल्याचे तपासणीत उघड झाले. यावरून आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT