ईश्वरपूर : पतसंस्थेकडून काढून दिलेल्या कर्जाचे हप्ते भरा असे सांगण्यासाठी गेलेल्या पती पत्नीला शिवीगाळ करून दगडाने मारहाण केल्याचा प्रकार पेठ (ता. वाळवा) येथील अभियंतानगरमध्ये शनिवारी रात्री घडला. याप्रकरणी रूपाली राजेंद्र निकम (रा. अभियंतानगर पेठ) या महिलेवर ईश्वरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय बबनराव निकम (रा. अभियंतानगर ) हे जखमी झाले आहेत. संजय यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती, संजय निकम यांची पत्नी अनिता यांनी रूपाली निकम हिला पतसंस्थेतून कर्ज काढून दिले आहे. शनिवारी रात्री अनिता या रूपाली यांच्याकडे गेल्या होत्या. कर्जाचे हप्ते तुम्ही भरा, असे त्यांनी रूपाली हिला सांगितले. याचा राग रूपाली हिला आला. तिने अनिता यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली. यावेळी संजय निकम भांडण सोडवत असताना रूपाली हिने पाठीमागून येऊन संजय यांच्या डोक्यात दगड मारल्याने ते जखमी झाले.