सांगली पॅटर्न : कन्या सबलीकरण अभियान  
सांगली

Sangli News : अबला नही सबला है हम

सांगली पॅटर्न : कन्या सबलीकरण अभियान : 50 शाळेतील 38 हजार विद्यार्थिंनी घेताहेत कराटे प्रशिक्षण

पुढारी वृत्तसेवा

सांगली : ‌‘आज मी सांगली येथील पुरोहित कन्या प्रशालेत सकाळी आठ वाजता गेलो होतो. त्यावेळी, कराटे प्रशिक्षणाने मुलींचा वाढलेला आत्मविश्वास पाहून खूप समाधान वाटले‌’..ही भावना आहे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची.

मुलींच्या मेंदूसोबत त्यांचे मन आणि मनगट पण भक्कम झाले पाहिजे या भावनेतून सांगली जिल्हा प्रशासन, माध्यमिक शिक्षण विभाग आणि क्रीडा विभागाने संयुक्तपणे कन्या सबलीकरण योजनाच सुरू केली असून ही योजना सांगली पॅटर्न म्हणून रुजते आहे. ऑगस्ट महिन्यापासून जिल्ह्यातील 50 शाळांमध्ये ही योजना राबवली जात असून 38 हजारपेक्षा जास्त विद्यार्थिनींचा या प्रशिक्षणात सहभाग आहे. जिल्हाधिकारी काकडे यांच्या संकल्पनेतून कन्या सबलीकरण योजनेंतर्गत स्वसंरक्षणाचे धडे घेणाऱ्या मुली आता प्रत्यक्ष संकटाचा सामना करण्यास सज्ज झाल्या आहेत. मोहिमेला मोठे यश येत असल्याची अनेक उदाहरणे दिसत आहेत.

परिवर्तनाची सुरवात

पाचवीत शिकणाऱ्या एका मुलीने अतिशय बोलके उदाहरण दिले. पूर्वी तिची आई रोज तिला शाळेत आणायची-न्यायची. कराटे प्रशिक्षण सुरू झाल्यापासून तिचा आत्मविश्वास वाढला आहे. आता ती निर्धास्तपणे एकटी शाळेत ये-जा करते. हीच खरी परिवर्तनाची सुरुवात आहे. आत्मसंरक्षण केवळ कौशल्य नसून ते स्वावलंबन, निर्भयता आणि आत्मविश्वास घडवते, असे मत जिल्हाधिकारी काकडे यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT