पारेकरवाडीत लोखंडी गजाने कुटुंबावर हल्ला pudhari photo
सांगली

Sangli Crime : पारेकरवाडीत लोखंडी गजाने कुटुंबावर हल्ला

चौघे जखमी ः दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : पारेकरवाडी (ता. आटपाडी) येथे कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत एकाच कुटुंबातील चौघे जखमी झाले. ही घटना रविवार, दि. 22 फेब्रुवारीरोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी दहाजणांविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी दाजी नामदेव पडळकर (वय 31, मूळ रा. पडळकरवाडी, ता. आटपाडी; सध्या रा. नवी पनवेल, मुंबई) हे आपले वडील नामदेव पडळकर, आई तुळसाबाई पडळकर व भाऊ अक्षय पडळकर यांच्यासह मुलगा मल्हार यास आणण्यासाठी पारेकरवाडी येथे सासरवाडीस गेले होते. यावेळी ‌‘मुलाला का देत नाही‌’, तसेच ‌‘यापूर्वी वडिलांना का मारहाण केली‌’, असा जाब विचारल्याने वाद पेटला. या वादातून संशयित समाधान चंद्रकांत काळे याने फिर्यादीस खाली पाडले. त्यानंतर समाधान काळे व चंद्रकांत प्रभू काळे यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, तर दीपक सुखदेव काळे याने लोखंडी गजाने फिर्यादीच्या डोक्यात हल्ला केल्याने तो जखमी झाला. दरम्यान, फिर्यादीचे वडील नामदेव पडळकर हे भांडण सोडविण्यासाठी आले असता, चंद्रकांत काळे याने त्यांच्या उजव्या हातावर लोखंडी गजाने हल्ला केला, तसेच सुखदेव प्रभू काळे याने त्यांच्या पाठीवर व कमरेवर गजाने हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

यावेळी विठाबाई गारळे, कविता काळे व प्राजक्ता पडळकर यांनी मिळून फिर्यादीची आई तुळसाबाई यांना खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे आणि संशयितांनी फिर्यादीच्या वाहनावर दगड व लोखंडी गजाने प्रहार करून नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT