पलूस : पलूस तालुक्यातील मोराळे गावच्या हद्दीत येरळा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शीतल उत्तम पाटील (वय 28, रा. मोराळे, ता. पलूस) या दुपारी सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास घरातील सदस्यांसोबत येरळा नदी परिसरात गेल्या होत्या. यावेळी पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या नदीच्या पाण्यात बुडाल्या.
घटनेनंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, पलूस येथे दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सायंकाळी 4.20 वाजता ग्रामीण रुग्णालय पलूस येथील डॉ. भिसे यांनी फोनद्वारे पलूस पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई सुरू केली. अधिक तपास सुरू आहे.