gold theft Pudhari
सांगली

Sangli Theft: पाडळी येथे साडेपाच लाखांचे दागिने चोरीला

शिराळा तालुक्यातील पाडळी येथे जनावरांच्या शेडमध्ये घुसून चोरट्याने रविवारी 26 एप्रिलला रात्री 12 ते पहाटे पाचदरम्यान सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी केली

पुढारी वृत्तसेवा

शिराळा : शिराळा तालुक्यातील पाडळी येथे जनावरांच्या शेडमध्ये घुसून चोरट्याने रविवारी 26 एप्रिलला रात्री 12 ते पहाटे पाचदरम्यान सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी केली. यामध्ये सुमारे 5 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी शिराळा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद प्रशांत विठ्ठल पाटील (वय 40, रा. पाडळी, ता. शिराळा) यांनी दिली आहे.

शिराळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रशांत पाटील यांच्या जनावरांच्या शेडमध्ये 26 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 ते पहाटे 5 यादरम्यान चोरट्याने प्रवेश केला व शेडमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरीस गेलेल्या मालामध्ये बोरमाळ, नेकलेस, मंगळसूत्र, चेन, ब्रेसलेट, अंगठ्या, टॉप्स, पुतळ्या तसेच चांदीचे दागिने असा एकूण 5 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आनंदा जाधव करत आहेत. दरम्यान, चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT