दिवाळीत ५० हून अधिक आगीच्या घटना 
सांगली

Sangli Fire Incident| दिवाळीत ५० हून अधिक आगीच्या घटना

शहर परिसरात अजूनही सत्र सुरूच; अग्निशामक दलाची कसरत

पुढारी वृत्तसेवा

सांगली : दिवाळीमध्ये फटाक्यांची आतषबाजी आणि पणत्यांमुळे सांगली परिसरात ५० हून अधिक आगीच्या घटना घडल्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी २४ तासात तब्बल ३५ ठिकाणी लहान-मोठ्या आगी लागल्या. अग्निशमन वाहने व जवान दिवाळीच्या दिवशी सायंकाळपासून जे आगीच्या कॉलवर रवाना झाले, ते थेट दुसऱ्या दिवशी सकाळीच अग्निशमन केंद्रात परतले. लागोपाठ नियंत्रण कक्षाचे फोन खणाणत होते. दरम्यान, अजूनही किरकोळ स्वरूपाच्या आगीच्या घटना घडतच आहेत.

अग्निशमन दलांना आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत होती. प्रामुख्याने वाळलेले गवत, कचरा, भंगार साहित्य आणि घरांच्या गच्चीवर फटाक्यांच्या ठिणग्या पडल्याने या घटना घडल्या. यातील बहुतांशी घटना फटाक्यांमुळे घडल्या होत्या. लक्ष्मीपूजनाच्या एका रात्रीत ३५ आगीचे कॉल अग्निशमन दलाला आले. आता दिवाळी संपली तरी किरकोळ स्वरूपात आगीच्या घटना घडतच आहेत.

मुख्य अग्निशमन अधिकारी भागवत सोनोने यांनी दिवाळी सणाच्या दिवशी सहा मोठी अग्निशमन वाहने, दोन लहान स्वरूपाची अग्निशमन वाहने, चार फायर बुलेट बाईक अशी यंत्रणा दुपारपूर्वीच तैनात करून ठेवली होती.

८ ते १० नोव्हेंबर यादरम्यानच्या घटना

नारळ आणि इतर झाडे पेटली : २९, कचऱ्याला आग : ६, उसाचे फड पेटले : ५, गोडाऊन, दुकान, घरांना आग : ६.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT