Sangli Online fraud: सांगलीत ऑनलाईन रक्कम देण्याच्या बहाण्याने 44 हजार रुपयांना गंडा Pudhari
सांगली

Sangli Online fraud: सांगलीत ऑनलाईन रक्कम देण्याच्या बहाण्याने 44 हजार रुपयांना गंडा

सांगली शहरातील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमजवळ ऑनलाईन रक्कम देण्याच्या बहाण्याने दोघांनी एकाला 44 हजार 500 रुपयांचा गंडा घातला

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली शहरातील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमजवळ ऑनलाईन रक्कम देण्याच्या बहाण्याने दोघांनी एकाला 44 हजार 500 रुपयांचा गंडा घातला. सागर धेोंडिराम बुवा असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी त्यांनी अज्ञात दोघाविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर बुवा हे दि. 21 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये रक्कम काढण्यासाठी गेले होते. त्यांनी एटीएममधून 44 हजार 500 रुपयांची रक्कम काढली. त्यानंतर ते एटीएममधून बाहेर आले. यावेळी एटीएमच्या बाहेर थांबलेले दोघे अनोळखी तरुण त्यांच्याजवळ गेले. अज्ञातांनी त्यांना ऑनलाईन रक्कम पाठवतो, आम्हाला रोख रकमेची गरज आहे, असे सांगून त्यांच्याकडून 44 हजार पाचशे रुपये घेतले व ऑनलाईन रक्कम पाठवल्याचा खोटा मेसेज सागर बुवा यांना दाखवला.

यानंतर दोघांनी विना क्रमांकाच्या दुचाकीवरून पलायन केले. दोघे निघून गेल्यानंतर सागर बुवा यांनी त्यांच्या खात्याची तपासणी केली असता खात्यावर रक्कम आली नसल्याचे निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी दोघा अज्ञातांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT