Accident Pudhari
सांगली

Sangli Accident| सांगलीत दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू

दोघे जखमी : रक्षाविसर्जनासाठी जाताना अपघात

पुढारी वृत्तसेवा

सांगली : रक्षाविसर्जनासाठी घरातून निघालेल्या एकाचा दोन दुचाकींच्या धडकेत मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. कोल्हापूर रस्त्यावरील चिंतामणी हॉलसमोर बुधवार, दि. १८ रोजी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सुरेश बसप्पा हदीमनी (वय ५०, रा. हनुमाननगर, सांगली) असे मृताचे नाव असून, या अपघातात गुणधर शंकर आवळे (वय ७०, रा. गुलाब कॉलनी, सांगली) आणि रमेश उद्धप्पा खिलारे (वय ३५, रा. बेनचंदमर्डी, गोकाक, कर्नाटक) गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सुरेश हदीमनी आणि गुणधर आवळे हे दोघे बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास हनुमाननगर येथून अमरधाम स्मशानभूमीकडे दुचाकीवरून (क्र. एमएच १० ईएफ ५८४०) निघाले होते. ते शंभरफुटी रस्त्यावरून कोल्हापूर रस्त्यावर आले असता बसस्थानकाकडून अंकली मार्गे गोकाकच्या दिशेने रमेश खिलारे व त्यांचा मित्र दुचाकीवरून (क्र. केए २८ एचयू ९९१) वेगाने निघाले होते.

चिंतामणी हॉलसमोरील कॉर्नरवर खिलारे यांच्या दुचाकीने हदीमनी यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात दोन्ही दुचाकींवरील तिघेही रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे कोल्हापूर रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांनी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना सुरेश हदीमनी यांचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी गुणधर आवळे व रमेश खिलारे यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT