सांगली

सांगली: शेतातून घरी जाताना अंगावर वीज पडल्याने एकाचा मृत्‍यू

अमृता चौगुले

नागज(सांगली), पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्‍हातील घोरपडी(ता.कवठेमहांकाळ) येथे वीज अंगावर कोसळल्याने एकाचा मृत्‍यू झाला आहे. बापू अर्जुन नरळे ( वय ३६) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घोरपडी येथील नरळे वस्तीवर घडली.

याबाबतची मिळालेल्‍या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी घोरपडीसह परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. दुर्दैवी बापू नरळे हे मोटारसायकलने शेतातून नरळेवस्तीवरील घराकडे निघाले होते. मोटारसायकलवर असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या दुर्घटनेत त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला.

बापू नरळे यांनी गतवर्षी ग्रामपंचायत निवडणुकीला सरपंच पदाची निवडणूक लढवली होती. या दुर्दैवी घटनेमुळे घोरपडीसह परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT