Illegal Sand Transport Pudhari
सांगली

Sangli Illegal Sand Transport : निंबवडेत अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई

तहसीलदारांचे विशेष पथक : वाळूसह डंपर प्रशासनाच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : निंबवडे (ता. आटपाडी) येथे अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक करणारा डंपर तहसीलदार शीतल बंडगर यांच्या पथकाने वाळूसह ताब्यात घेतला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या निर्देशानुसार आणि उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबररोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास निंबवडे येथून दिघंचीच्या दिशेने जाणारा एक डंपर तहसीलदार शीतल बंडगर आणि निवडणूक नायब तहसीलदार प्रकाश सगर यांच्या निदर्शनास आला. संशय आल्याने अधिकाऱ्यांनी डंपर थांबवून तपासणी केली असता, त्यात विनापरवाना अवैध वाळू आढळून आली.

महसूल अधिकाऱ्यांनी तत्काळ डंपर ताब्यात घेऊन जप्तीची कारवाई केली. मागील अवघ्या १५ दिवसांतील अवैध वाळू वाहतुकीविरोधातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. सध्या आगामी निवडणुकीची कामे, दुष्काळ व्यवस्थापन आणि पीक पाहणी पंचनाम्यांची मोठी जबाबदारी खांद्यावर असतानाही महसूल प्रशासनाने अवैध धंद्यांवर व वाहतुकीवर बारीक लक्ष ठेवले आहे. संबंधित डंपरचालक व मालकावर शासनाच्या नियमांनुसार पुढील कडक कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT